Pune : अंमली पदार्थांची ऑनलाइन डिलिव्हरी; गुन्हे शाखेकडून 51 लाखाचा LSD साठा जप्त

एमपीसी न्यूज-अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांनी (Pune)  हायटेक फंडा वापरला असून आता या पदार्थाची घरपोच डिलिव्हरी दिली जात आहे. पुणे पोलिसांनी या संदर्भातले एक रॅकेट उघडकीस आणले आहे. डंजो या ऑनलाईन डिलिव्हरी ॲपद्वारे खरेदी विक्री करणाऱ्यांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान तब्बल 51 लाख 60 हजार रुपयांचे एलएसडी जप्त करण्यात आले आहे.

रोहन दीपक गवई (वय 24), सुशांत काशिनाथ गायकवाड (वय 26),  धीरज दीपक ललवाणी (वय 24),  दीपक लक्ष्मण गेहलोत (वय 25) आणि ओमकार रमेश पाटील (वय 25) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

 

Dapodi : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे पोलीस अंमलदार विशाल शिंदे यांना पुणे शहरात डंजो ऑनलाईन डिलिव्हरी ॲपद्वारे एल एस डी या अंमली पदार्थाची खरेदी विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सखोल चौकशी करून सुरुवातीला रोहन गवळी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल 90 हजार रुपये किमतीचे 30 मिलिग्रॅम एलएसबी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले.

एकूण पाच आरोपीकडून पोलिसांनी 53 लाख 35 हजार रुपये किमतीचे एल एस डी या अंमली पदार्थाचे 17 ग्रॅम वजनाचे 1032 तुकडे जप्त केले.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे विनायक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, पोलीस अंमलदार विशाल शिंदे, मनोज कुमार साळुंखे, पांडुरंग पवार, राहुल जोशी, रेहाना शेख, योगेश मोहिते यांच्या पथकाने (Pune) केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.