Pune : दामदूप्पटीचे आमिष दाखवून ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारे महिलेची दीड लाखांची फसवणुक 

एमपीसी न्यूज – दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून एटीएमची माहिती मिळवून महिलेची ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारे जवळपास दीड लाखांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. जानेवारी 2018 ते 4 मे 2018 या कालावधीत ही फसवणुक करण्यात आली आहे.

याप्रकरणी खडकी येथे राहणा-या एका 66 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी महिलेस इंदौर मधील बोनाझ कॅपीटल इन्हेसमेंट ऍडव्हायझर कंपनी मधून सत्यविर आणि मनोज वर्मा यांनी फोन केला. आणि त्यांनी दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून महिलेला त्यांच्या कंपनीत शेअर्स गुंतविण्यास सांगितले. दरम्यान त्यांनी महिलेच्या एटीएम कार्डची गोपणीय माहिती विचारून त्यांच्या खात्यातुन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून तब्बल 1 लाख 44 हजार 598 रूपये काढून घेतले.याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खराडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.