Pune : ओएलएक्सवर नोकरीची जाहिरात देऊन महिलेची पावणे दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ओएलएक्सवर नोकरीची जाहिरात देऊन केली महिलेची ऑनलाईन माध्यमाद्वारे तब्बल पावणे दोन लाखांची केल्याचे उघडकीस आले आहे.

हा प्रकार फेब्रुवारी 2018 ते जून 2018 या कालावधीत ऑनलाईन माध्यमाद्वारे करण्यात आला. याप्रकरणी धानोरी येथे राहणा-या एका 39 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने ओएलएक्स या साईटवर नोकरीची जाहिरात दिली होती. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी वेगवेगळ्या क्रमांकावरून आपण इंडिगो एअरलाईन्स या कंपनीचे एच.आर बोलत असून नोकरी मिळवण्यासाठी बँकेत पैसे भरावे लागतील असे सांगून फिर्यादी महिलेकडून टप्प्याटप्प्याने एकूण 1 लाख 75 हजार रूपये घेतले.

परंतु एवढी रक्कम भरून देखील त्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी न लावता अज्ञात व्यक्तींनी तिची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.