Pune: अंत्यसंस्कारासाठी ‘ऑनलाईन पास’ सुविधा उपलब्ध

Pune: Online pass facility available for funerals by PMC

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेने अंत्यसंस्कारासाठी स्मशान दाखला देण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पीएमसी केअर या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येतील.

महापालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मयत पास आवश्यक असतो.क्षेत्रीय कार्यालये, पालिकेची रुग्णालये, विश्रामबाग वाडा अशा ठिकाणी पास मिळतो. रात्रीच्या वेळी पास मिळणे अशक्य होते आणि सध्या कर्फ्यू असल्याने पाससाठी हेलपाटे घालणे शक्य होत नाही. यातून समस्या उदभवल्या, नागरिकांची धावपळ होवू लागली. ते टाळण्याकरिता ऑनलाईन सुविधा केली आहे.

पहिल्या टप्प्यात वैकुंठ, कैलास आणि येरवडा स्मशानभूमीत संगणक बसविण्यात येणार आहे. तेथील कर्मचारी संगणकावर माहिती पाहू शकतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.