Pune : शहरातील 63 टक्केच नाल्याची सफाई, आम्ही समाधानी नाही – जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील 180 किलोमीटरच्या (Pune) नाल्यांची केवळ 63 टक्केच नालेसफाईच काम झाल्याच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. पण त्यावर आम्ही समाधानी नसून ज्या ठिकाणी नाल्याची सफाई करण्यात आली आहे, आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील पावसाचा अंदाज लक्षात घेता, शहरातील नालेसफाईची कामे पुणे महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर करण्यात यावी. या मागणीसाठी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन मागणी केली.
यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, पुणे शहरातील विविध भागातील नालेसफाई योग्य प्रकारे झाली पाहिजे. सध्या शहरातील नाल्यांची बिकट अवस्था असून काही अधिकारी कागदावरच नाले सफाई झाल्याचे दाखवत आहेत. अधिकारी आणि संबधित ठेकेदार मिलीभगत करीत आहेत.
या कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करीत आहेत. त्या सर्वांवर कारवाई केली पाहिजे. ही बाब महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या निदर्शनास आजच्या भेटीत आणून दिली असून लवकरात लवकर नालेसफाई झाली पाहिजे अशी मागणी देखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Pune : काव्य, नृत्य, एकपात्री प्रयोग यांमधून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकर
तसेच ते पुढे म्हणाले की, सद्य स्थितीला 63 टक्के नालेसफाईच (Pune) काम झाले आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. मागील वर्षी एका तासाच्या पावसात शहरातील अनेक भागातील घरामध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या घटना पुन्हा घडू नये. त्या दृष्टीने शहरातील नालेसफाई 15 दिवसात करावे. तसेच सध्याच्या कामावर आम्ही समाधानी नसून ज्या ठिकाणी नालेसफाई करण्यात आली आहे, त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते जाऊन पाहणी करणार आहेत. या कामासाठी पूर्णवेळ उपायुक्त नेमण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी त्यांनी सांगितले.