Pune : ‘ओन्ली एच आर ‘ संस्थेचा पाचवा वर्धापनदिन 27 डिसेंबरला

डॉ. अनिल अवचट , डॉ. आनंद नाडकर्णी करणार मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज- पुण्याच्या कार्पोरेट जगतातील मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांची शिखर संस्था असलेल्या ‘ ओन्ली एच आर ‘ संस्थेचा पाचवा वर्धापनदिन 27 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती ‘ ओन्ली एच आर ‘ संस्थेचे अध्यक्ष सुधीर फाटक, सचिव प्रशांत इथापे, खजिनदार जितेंद्र पेंडसे यांनी पत्रकाद्वारे दिली.

_MPC_DIR_MPU_II

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लेखक डॉ. अनिल अवचट , डॉ. आनंद नाडकर्णी मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांना मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता नेहरू सभागृह, (घोले रस्ता ) येथे होईल.

पुण्याच्या कार्पोरेट जगतात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांचा सत्कार ‘ एचआर प्रोफेशनल अवार्ड ‘ देऊन यावेळी डॉ. अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. ‘ संतांचे मानसशास्त्र ‘ या विषयावर डॉ. आनंद नाडकर्णी हे या कार्यक्रमात व्याख्यान देणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.