Pune : विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि त्यांचे पती बाबा धुमाळ यांची कोरोनावर मात

Opposition leader Deepali Dhumal and her husband Baba Dhumal defeated Korona : सुप्रिया सुळे यांनी केले कौतुक

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि त्यांचे पती बाबा धुमाळ यांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली. त्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावाही सुरू केला आहे. त्यांच्या या कामाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले.

वारजेतील गोकुळनगर पठार येथे नागरिकांना रस्त्याची अडचण निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी नागरिकांनी संवाद साधला.

यावेळी दिपाली धुमाळ, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, माजी नगरसेवक नगरसेवक बाबा धुमाळ, सुरेश गुजर, अतुल दांगट, निव्रुत्ती येनपुरे उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, दीपाली धुमाळ आणि बाबा धुमाळ या दोघांनीही कोरोनावर मात केली. सध्या दोघेही पूर्ण ताकदीने कामालाही लागले आहेत. मला या दोघांचाही मला अभिमान वाटतो. एकदा कोरोना झाला की परत होत नाही असे म्हणतात.

मात्र, तरीही सर्वांनीच मास्क लावावा, स्वच्छता पाळावी, फिजिकल डिस्टन्स ठेवावे, त्यामुळे काही महिन्यांतच आपण कोरोनावर मात करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत असल्याने रुग्ण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. योग्य वेळी उपचार घेतल्यास कोरोना सुध्दा बरा होऊ शकतो.

नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे. मास्क, सॅनिटायजर, फिजिकल डिस्टनसिंग पाळावे. विशेषतः जेष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे दीपाली धुमाळ आणि बाबा धुमाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.