Pune : विरोधी पक्षांचे गटनेते, आमदार, खासदारांना व्हावे लागणार क्वारंटाईन ?

Opposition leaders, MLAs, MPs have to be quarantined?

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतील महिला पदाधिकारी आणि तिच्या पतीला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. या पदाधिकाऱ्यांसोबत विरोधी पक्षांचे गटनेते, आमदार, खासदार, चालक उपस्थित होते. या सर्वांची यादी तयार करण्यात आली असून,त्यांना क्वारंटाईन राहावे लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर, काही गटनेते क्वारंटाईन झाल्याची माहिती पुढे आली आहे.

साधारण पाच दिवसानंतर कोरोनाची लक्षणे दिसू लागतात. सध्या लक्षणे दिसू लागली तरच कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

कोरोना झालेल्या व्यक्तीच्या सहवासात किती काळ ती व्यक्ती आली, त्यांनी काही वस्तूंचा वापर केला असल्यास काही लक्षणे समोर येतात. एकदम कोरोना होत नाही.

गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वच विरोधी पक्षांचे गटनेते अनुपस्थित होते. त्यामुळे काही जेष्ठ नगरसेवकांनी भाजप विरोधात प्रतिक्रिया देऊन सभात्याग केला.

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. नगरसेवक मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये मिसळत असल्याने त्यांना या कोरोनाची लागण होण्याची भीती आहे.

नगरसेवकांनी मास्क लावावे, सॅनिटायजरचा वापर करावा, फिजिकल डिस्टनसिंग पाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे शहारत आता कोरोनाचे साडे दहा हजारांहून जास्त रुग्ण झाले आहेत. रोज 2 हजार 200 ते 2 हजार 500 चाचण्या करण्यात येत आहे.

कोरोना झाला म्हणून घाबरण्याचे काही कारण नाही. उलट कोरोना झाल्यानंतर काळजी घेऊन योग्य ते उपचार घेतल्यानंतर कोरोना सुद्धा बरा होऊ शकतो, हे बरे झालेल्या रुग्णांनी दाखवून दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.