Pune: शहरात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असताना विरोधी पक्षांची भूमिका खेदजनक: महापौर

Pune: Opposition's role deplorable in Corona situation in the city: Mayor murlidhar mohol आपले वर्तन हे अत्यंत न शोभणारे आहे. आपण लोकांसाठी काम करणारे माणसे आहोत, याची आठवणही त्यांनी करून दिली.

एमपीसी न्यूज- पुणे शहरात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असताना विरोधी पक्षांनी घेतलेली भूमिका अतिशय खेदजनक असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.

आपल्या पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे कुटुंबीय पॉझिटिव्ह आहेत. अशा परिस्थितीत आणखी कोणाला लागण झाली तर काय? असा सवाल उपस्थित करून आपण सर्व ज्येष्ठ मंडळी आहात. कोरोनाची माहिती देण्यासाठी सभासदांचे ग्रुप करण्यात आले आहेत. त्यावर रोजच्या रोज अपडेट दिले जाते.

प्रभाग समितीच्या बैठका नियमित होतात. तुम्ही आज कसे पैशाचा हिशोब मागता? अशा शब्दांत महापौरांनी विरोधी पक्षांची कानउघाडणी केली.

आपले वर्तन हे अत्यंत न शोभणारे आहे. आपण लोकांसाठी काम करणारे माणसे आहोत, याची आठवणही त्यांनी करून दिली.

दरम्यान, बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांनी गोंधळ घातला होता. त्या पार्श्वभूमीवर सभासदांना जी-जी माहिती हवी, असेल ती क्षेत्रीय कार्यालयस्तरावर देण्यात यावी, असे आदेश महापौरांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

तर, मागील तीन महिन्यांत कोरोनासाठी 125 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, हे संकट आटोक्यात येत नसल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.