Pune : शहरातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या सोसायटी, निवारागृहे, वृद्धाश्रम, निवारा केंद्रे,आधारकेंद्रे अशा ठिकाणी जाउन वृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 15 वैद्यकीय पथके (टिम ) तयार करण्यात आली आहेत. परिमंडळ वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हे वैद्यकीय पथक काम करणार आहे. या पथकात वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी यांचा सहभाग आहे.

परिमंडळाकडील परिमंडळ वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली वृद्ध नागरिकांची तपासणी करण्यात येऊन आरोग्य तपासणी अहवाल परिमंडळ वैद्यकीय अधिकारी यांचेकडे सादर करावयाचा आहे.

15 वैद्यकीय पथकास (टिमला ) लागणारे वाहने व मनुष्यबळ मनपाच्या वाहन विभागाने उपलब्ध करून द्यावयाची आहेत. पथकास लागणारी औषधे, वैद्यकीय साधन सामुग्री, मध्यवर्ती औषध भांडार विभाग उपलब्ध करून देणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.