Pune : पुणे, बारामती, सासवड येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या (Pune )राज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात पर्यटन, सांस्कृतिक कार्य विभाग आणि  पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने 28 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. 

पुणे येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृह येरवडा, बारामती (Pune )येथील विद्या प्रतिष्ठानचे गदिमा सभागृह आणि सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृह येथे हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या ठिकाणी मराठी कला, नाट्य, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य आहेत.

महोत्सवाअंतर्गत 28 फेब्रुवारी रोजी उदघाटन सभारंभात अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृह येथे ढोल ताशा पथक, गणेश वंदना व वारसा संस्कृतीचा, गदिमा सभागृह बारामती येथे गरजा नाट्य छटांचा, हास्य विनोद आणि कीर्तन व सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहात लावणीचा कार्यक्रम होणार आहे.

29 फेब्रुवारी रोजी अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात भजन मंडळ स्पर्धा, पारितोषिक वितरण व अभंगरंग,  गदिमा सभागृह बारामती येथे ‘यदा कदाचित नाटक’, तर सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहात एकांकिका व ‘सोबतीचा करार’ हे नाटक होईल.

1 मार्च रोजी अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात एकांकिका, कविता वाचन आणि यदा कदाचित नाटक,  गदिमा सभागृह बारामती येथे एकांकिका व ‘तुझी आठवण’ हे नाटक तर सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहात भारुडाचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

Dighi  : ‘डिफेन्स एक्स्पो’ला विद्यार्थी आणि उद्योजकांचा भरभरून प्रतिसाद

2 मार्च रोजी अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात

एकांकिका, बोक्या सातबंडे व देशभक्तीपर संगीत,  गदिमा सभागृह बारामती येथे बोक्या सातबंडे, एकांकिका व गीत रामायणाचा कार्यक्रम होईल.

3 मार्च रोजी अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात, एकांकिका, संस्कृती जत्रा व नक्षत्रांचे देणे आणि नदीकाठीच्या मार्गाने पुणे विद्यापीठतर्फे लहान मुलांची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येईल. गदिमा सभागृह बारामती येथे एकांकिका, स्वराज्य गाथा शिवदर्शन,  एकांकिका  हे कार्यक्रम होणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिद्धी मिळावी हा या  महासंस्कृती महोत्सवामागचा उद्देश आहे.

राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी महासंस्कृती महोत्सव महत्वपूर्ण ठरणार आहे.

 

 

https://www.youtube.com/watch?v=bmL7SiXmo9Q&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.