Pune : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजउपयोगी कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – काँगेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांचा वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबत राष्ट्रवादीने नुकतीच महापालिकेत बैठक घेतली.

यावेळी नगरसेवक, शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टींगरे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे उपस्थित होते. पुणे शहरातून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. राज्यात सरकार आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजित पवार यांचा तातडीने मंत्रिमंडळात समावेश होण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे.

येत्या गुरुवारी (दि. 12 डिसेंबर) शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यावर चर्चा करण्यात आली. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आमदार चेतन तुपे आणि सुनील टिंगरे यांची निवड झाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.