BNR-HDR-TOP-Mobile

Pune : नृत्यभारतीतर्फे ‘स्रोतस्’ कथक मैफलीचे आयोजन

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – “नृत्यकला म्हणजे उपासना, साधना मानून स्वत:च्या मिळालेल्या कलेचा वारसा श्रध्देने पुढे नेणारे लखनौ घराण्याचे प्रसिद्ध नर्तक सुभाषचंद्र यांच्या ‘स्रोतस्’ या कथक मैफिलीचे आयोजन केले आहे.

ही मैफल दि. २० मे रोजी करण्यात आले आहे. नृत्यभारती कथक डान्स अकॅडमीतर्फे बालशिक्षण सभागृहात ही मैफल सायंकाळी पाच वाजता भरविण्यात येणार आहे. नृत्यकलेचे इतिहासकार आणि सुप्रसिद्ध समीक्षक पद्मश्री सुनील ठाकूर यांची विशेष उपस्थिती यावेळी लाभणार आहे.

  • स्व. पं. मोहनराव कल्याणपूरकर यांचे शिष्य सुभाषचंद्र यांच्या नर्तनामध्ये गुरूंचे प्रतिबिंब अगदी स्वच्छ दिसते. आपल्या तिन्ही गुरूकडून आत्मसात केलेले कलेचे बारकावे सुभाषचंद्र प्रस्तुतीमधून कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात अनुभवता येतील. तर, गुरु पं. रोहिणी भाटे यांच्या शिष्या नीलिमा अध्ये आणि सुभाषचंद्र यांचे एकत्रित कथक सादरीकरण कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात रसिकांना बघायला मिळेल. विशेष म्हणजे, हे दोघे प्रथमच एका कलामंचावर या मैफलीच्या माध्यमातून करत आहेत.

सुभाषचंद्र यांनी वेळोवेळी स्व. रोहिणी भाटे यांच्याकडून मार्गदर्शन घेतले होते. कथकच्या इतिहासात पं. रोहिणी भाटे आणि गुरु पं. मोहनराव कल्याणपूरकर यांची गुरू शिष्यांची जोडी परंपरा उजळून टाकणारी ठरली होती.नीलिमा अध्ये यांना दीर्घकाळ आपल्या गुरूचा सहवास मिळाला.

  • सुभाषचंद्र आणि नीलिमा अध्ये यांच्या प्रस्तुतीमधून एक अतूट गुरू परंपरेचे स्वाभाविक साधर्म्य आणि गुरूंची वैशिष्ट्ये पहायला मिळतील. गुरू रोहिणी भाटे यांनी ७१ वर्षापूर्वी स्थापन केलेल्या नृत्यभारती कथक डान्स अकॅडमी यांच्यासह नीलिमा अध्ये यांची प्रकृति कथक नृत्यालय ही संस्था देखील आयोजनात सहभागी झाली आहे.
HB_POST_END_FTR-A2

.