सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Pune : तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात चोरी ; मूर्तींच्या पायातील चांदीचे चाळ चोरीस

एमपीसी न्यूज – पुण्यातील तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आहे. या घटनेत मंदिरातील श्रीराम आणि लक्ष्मण या दोन मूर्तीच्या पायातील चांदीचे चाळ तसेच पुजाऱ्याचा मोबाईल चोरीला गेला.

याबाबत विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.1) सकाळी सातच्या सुमारास मंदिराचे पुजारी संकेत मेहेंदळे नेहमीप्रमाणे मंदिरात आले. पूजा करण्यासाठी मंदिरात परिसरात असलेल्या नळावर पाणी आणण्यासाठी गेले असता एका अंदाजे 25 वर्षीय तरुण मंदिराच्या गाभाऱ्यात शिरला.

या तरूणाने श्रीराम आणि लक्ष्मणाच्या पायातील चांदीचे चाळ चोरून नेले. या दोन्ही दागिन्यांचे वजन प्रत्येकी 150 ग्रॅम असून एकूण 11 हजार 400 रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. तसेच पुजार्‍याचा मोबाईल देखील चोरून नेला.

मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातुन विश्रामबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.

spot_img
Latest news
Related news