Pune News : पुण्यातील ओशो आश्रमाबाहेर गदारोळ; आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

एमपीसी न्यूज : पुण्यातील ओशो आश्रमामध्ये पोलिसांनी (Pune News) एका तरुणावर लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाने गोंधळ घातल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करून त्याला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले. काल ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माला घालून जाण्याची मुभा क्षणिक ठरली. आज पुन्हा संन्याशी माला घालून प्रवेशास बंदी केल्यानंतर 150 ते 200 ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट उघडून आश्रमात प्रवेश केला. काहीही झाले, तरी आश्रमात प्रवेश शुल्क न भरता संन्याशी माळ घालून जाण्याचा निर्धार ओशो अनुयायांनी केला.

 

Pune news : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराचा 39 वा वर्धापन दिन साजरा

 

 

आश्रमाच्या आतमध्ये जाऊन व्यवस्थापनाचा निषेध करणाऱ्या अनुयायांनी बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मोठी फौज दाखल झाली. पोलिसांनी वारंवार समजूत काढूनही अनुयायी (Pune News) आपल्या मागण्यांवर ठाम होते. ओशो आश्रमाच्या बचावासाठी व्यवस्थापन विरोधात जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले आहे. या लाठीमारात अनेक अनुयायी गंभीर जखमी झाले आहेत.

 

आचार्य रजनीश ओशो यांच्या शिष्यांनी कोरेगाव पार्क येथील आश्रमात आंदोलन केले होते. यावेळी शिष्यांच्या एकजुटीपुढे आश्रम व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेत शिष्याना संन्याशी माळा घालून आतमध्ये प्रवेश दिला होता. 70 व्या ओशो संबोधी दिवसानिमित्त कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमाच्या गेटवर जगभरातून दोन ते अडीच हजार ओशो शिष्य दाखल झाले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.