Bibvewadi:ओटा स्कीम हस्तांतरण शुल्कास स्थायी समितीची मंजुरी, 300 कोटी रुपयांचा महसूल मिळणार-हेमंत रासने

Pune: Ota scheme transfer fee to be approved by standing committee, corporation will get revenue of Rs 300 crore says Hemant Rasne भुईभाडे, नागरिकांना कर्जासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे, अनधिकृत बांधकामांसंदर्भात तडजोड रक्कम आकारणे, मिळकतकराबाबतच्या धोरणाला मान्यता देण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज- बिबवेवाडी आणि धनकवडी येथील जागांवर राबविण्यात आलेल्या ओटा स्कीमच्या निवासी व व्यावसायिक गाळ्यांच्या हस्तांतरण शुल्क आकारण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात सुमारे 300 कोटी रुपये वाढ होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांना दिली.

भुईभाडे, नागरिकांना कर्जासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे, अनधिकृत बांधकामांसंदर्भात तडजोड रक्कम आकारणे, मिळकतकराबाबतच्या धोरणाला मान्यता देण्यात आली आहे.

मुठा उजव्या कालव्याचे प्रदूषण रोखण्यासाठी 1983 च्या दरम्यान कालव्यालगत आणि जनता वसाहत, दांडेकर पूल, डायस प्लॉट, आंबील ओढा, पर्वती पायथा येथील झोपडपट्टीधारकांचे बिबवेवाडी आणि धनकवडी येथे पुनर्वसन करण्यात आले होते.

6 हजार 390 निवासी गाळे व 434 व्यावसायिक गाळ्यांचे वाटप करण्यात आले होते.

नव्या प्रस्तावानुसार गाळ्यांचे भाडे मिळकत वाटप नियमावली 2008 नुसार बाजारभावाप्रमाणे आकारणे, हस्तांतरण शुल्क म्हणून 75 हजार व दीड लाख रुपये तसेच कुटुंबातील व्यक्तीच्या नावे हस्तांतरण करावयाचे असल्यास 1 हजार रुपये शुल्क आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या संकट काळातही 2020-21 चे 7 हजार 390 कोटी रुपये अंदाजपत्रक पूर्ण होणार असल्याचा त्यांना ठाम विश्वास आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.