Pune News : केबल वायरमध्ये अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज : वडाच्या झाडावरील केबल वायरमध्ये अडकलेल्या बिबट्याला वन विभाग व वाइल्ड लाईफ एस ओ एस यांनी जीवनदान दिले आहे. (Pune News) बुधवार सकाळी ओतूर वनक्षेत्राच्या हद्दीतील गुलुंचवाडी गावामध्ये  केबल व झाडांच्या फांद्यांमध्ये अडकला बिबट्या स्व:ताचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता.येथील ग्रामस्थांनी तात्काळ वनविभाग व वाइल्ड लाईफ एस ओ एसला कळवल्याने या बिबट्याला जीवनदान मिळाले.

ग्रामस्थांनी सकाळी बिबट्याला झाडावर अडकलेला पाहून वन विभागाला कळवले. वन विभागाने जुन्नर जवळील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र मधील वाइल्ड लाईफ एस ओ एस टीमला कळवले. वन विभागाची व वाइल्ड लाईफ एसओएस च्या टीम्स घटनास्थळी पोहोचले. तेथे त्यांना दिसले की एक केबल बिबट्या भोवती घट्ट आवळलेला होता. तीन तासांच्या ऑपेरेशन मध्ये त्यांनी सुरक्षित अंतरावरून डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध केले. त्यानंतर बिबट्याला पंधरा फूट उंचीवरून झाडावरून खाली आणले व पिंजऱ्यात घालून माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रामध्ये सोडून दिले.

डॉ. चंदन सवणे, पशुवैद्यकीय अधिकारी, वाईल्ड लाईफ एस ओ एस, म्हणाले की, “ती मादी बिबट्या असून तिचे वय 9 ते 10 वर्ष आहे. तिच्या पोटाभोवती घट्ट आवळलेले केबल वायर आम्ही हळुवारपणे काढले. त्यानंतर आम्ही तिला माणिकडोह ला नेले. तेथे ती आमच्या देखरेखी खाली असून तिच्यावर उपचार चालू आहेत.”

Talegaon Dabhade : महिला सक्षमीकरणासाठी तळेगाव येथे खाद्य महोत्सव

वैभव काकडे, वन परीक्षेत्र अधिकारी, ओत्तूर म्हणाले की, “बिबट्या रात्रीचा शिकारीसाठी बाहेर फिरत होती. तेव्हा अचानकपणे तो केबल वायर मध्ये अडकला.(Pune News) घाबरून जाऊन ती झाडावर उडी मारून गेली पण त्यामुळे केबल वायर फांद्यांमध्ये अडकले. त्यामुळे वायर तिच्या पोटाभोवती घट्ट आवळले गेले व तिला बाहेर येता येत नव्हते. ग्रामस्थांनी याबाबत वन विभागाला पहाटे 4  वाजता कळवले. त्यानंतर वन विभागाची व वाइल्ड लाईफ एसओएस च्या टीम्स घटनास्थळी सकाळी 6:00 वाजता पोहोचली.”

कार्तिक सत्यनारायण, सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वाईल्ड लाईफ एस ओ एस म्हणाले की, “केबल वायर बिबट्याच्या पोटा भोवती घट्ट आवळले गेले होते. त्यामुळे ते लवकर काढण्याची गरज होती. जर थोडा विलंब झाला असता तर ते बिबट्यासाठी घातक ठरले असते. ग्रामस्थ व वन विभागाने आम्हाला लवकर कळवल्यामुळे बिबट्याचे प्राण वाचवता आले”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.