Pune : एकतर्फी प्रेमातून एकाने तरुणीला कोयता उगारुन धमकावले

एमपीसी न्यूज –  एकतर्फी प्रेमातून ( Pune) महाविद्यालयीन तरुणीवर कोयता उगारण्यात आला.ही घटना शुक्रवार पेठेतील सुभाषनगर परिसरात घडली. तेथून निघालेल्या एका महिलेने आरडाओरडा केल्यानंतर दुचाकीवरुन आरोपी पसार झाला. याप्रकरणी रात्री उशीरा एका तरुणाला अटक करण्यात आली.

या  प्रकरणी अधिक माहिती अशी की,  सुभाषनगर परिसरातून दुपारी तरुणी आणि तिची मैत्रीण निघाली होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या एकाने तरुणीवर कोयता उगारला. तरुणीने व तेथून निघालेल्या एका महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तरुण दुचाकीवरुन पसार झाला. सुदैवाने या घटनेत तरुणीला दुखापत झाली नाही.Nigdi : नाशिक ‘प्रेस’च्या बाद नोटा देण्याचे सांगत दहा लाख रुपये घेतले अन दिल्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.