Pune : राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा शानदार निकाल

Outstanding results of Rajiv Gandhi E-Learning School and Junior College

एमपीसी न्यूज – गेल्या 10 वर्षांपासून राजीव गांधी ई- लर्निंग स्कूल व ज्युनियर कॉलेजचा निकाल 100 टक्के येत असल्यामुळे पुणे महानगरपालिकेची मान उंचवणारा आहे, असे पुणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी सांगितले.

आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी 10 वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आबा बागूल यांनी राजीव गांधी ई- लर्निंग स्कूल सुरू केले. या शाळेच्या माध्यमातून गोर गरीब, आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विध्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळून समाजात उच्च स्थानावर पोहचण्यास मदत व्हावी, कोणीही परिस्थितीमुळे चांगले शिक्षण घेता आले नाही असे म्हणू नये, यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून राजीव गांधी इ लर्निंग स्कूल सुरू केले.

यंदा राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांनी घसघशीत यश मिळवत स्नेहा कुलकर्णी 96.6%,  वैष्णवी डांगे 93.69%,  अथर्व जगताप 92%,  निनाद वैद्य 92%,  ऐश्वर्या मिश्रा 90.15%,  प्रेरणा राठी 88.8%,  आयुषी नांगरे 80. 40 %,  निकिता धुळे 78.8%,  अदनान कुरेशी 78% गुण मिळवून यशस्वी झाले आहेत.

तसेच इयत्ता 10 वीच्या मुस्कान वर्मा 85%, श्रेया शिंदे 84.4%, शुभम राठोड 78.8% गुण मिळवून शाळेच्या मुकुटात मनाचा तुरा खोवला असून अशा गुणवंत विध्यार्थ्यांना भविष्यात शिक्षणासाठी लागणाऱ्या मदतीसाठी पुणे महानगरपालिका सदैव त्यांच्या बरोबर राहील, अशी ग्वाही आबा बागूल यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.