Pune : पी.ए. इनामदार इन्स्टिट्यूट ऑफ इम्फर्मेशन टेक्नोलॉजी’ संस्थेची स्थापना

एमपीसी न्यूज- शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी.ए. इनामदार इन्स्टिट्यूट ऑफ इम्फर्मेशन टेक्नोलॉजी (पै .आय.आय.टी.)’ संस्थेची स्थापना करण्यात आली.

आझम कॅम्पस ( पुणे कॅम्प ) येथे गुरुवारी (दि.५) हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी डॉ.पी. ए. इनामदार होते. संस्थेचे सहसचिव इरफान शेख, आय स्क्वेअर आय.टी. कंपनीचे कार्पोरेट रिलेशन्स विभागाचे प्रमुख आदेश पटवर्धन, सिटीज कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षद सांगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रुशाल हीना, ताहीर खान,स्वतंत्र जैन आदि उपस्थित होते.

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स ‘ इंटरनेट ऑन थिंग्स ‘ तंत्रामुळे जग बदलणार आहे .आताचे ७५ टक्के नोकऱ्या राहणार नाहीत, जगच बदलून जाईल. त्यामुळे तंत्र साक्षर होणे ही काळाची गरज आहे. माहिती तंत्रज्ञान आपल्याला विद्यार्थी आणि सामान्य लोकांपर्यंत न्यावे लागेल. यावेळी इन्फर्मेशन टेक्नोलोजी लॅबचे उदघाटन करण्यात आले. तसेच सायबर सिक्युरिटी (एथिकल हेकिंग) च्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ.पी ए इनामदार म्हणाले, “माहिती तंत्रज्ञान हे ‘नाहीरे’ वर्गापर्यंत नेण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.पहिलीपासून विद्यार्थ्यांना तंत्रसाक्षर बनविणे हेच उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवले आहे.माहिती तंत्रज्ञानात पारंगत झालो तरच जगावर राज्य करता येईल.आपण बदललो नाही, तर कालबाह्य होण्याची वेळ येऊ शकते “

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.