Pune : आठव्या ‘आय टी ऑलिम्पियाड’मध्ये पुण्याच्या विद्यार्थ्यांची बाजी

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पै कॉलेज ऑफ व्हिज्युअल ग्राफिक्स अँड डिझाईन ‘ आयोजित आठव्या ‘आय टी ऑलिम्पियाड’ वर पुण्याच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व गाजवले.

या स्पर्धेत अवनिश सिंग, शुभम आनंद हे विद्यार्थी प्रथम आले तर सारिका कुलकर्णी, रुपाली क्षीरसागर या प्रशिक्षकांचा गौरव करण्यात आला.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण ‘क्विक हील’ चे संस्थापक कैलास काटकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ पी ए इनामदार होते.
यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,प्राचार्य ऋषी आचार्य ,मुमताज सय्यद उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.