Pune : आयटी ऑलिपिंयाड विजेत्या विद्यार्थ्याना मिळाला हेलीकॉप्टरने पारितोषिक सोहळ्यास येण्याचा बहुमान !

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पै कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट्स ‘आयोजित ‘पै आयटी ऑलिपिंयाड’ चा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी (दि. 19) आयोजित करण्यात आला होता. यातील चार विजेत्यांना विमाननगर येथून हेलीकॉप्टरने सोहळ्यास आझम कॅम्पसला येण्याचा मान मिळाला.

आझम कॅम्पसच्या असेम्ब्ली हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला राहुल बक्षी (फोबस क्रिएशन्स मिडिया प्रा. लि. ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार हे अध्यक्षस्थानी होते. ‘पै कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट्स ‘प्राचार्य डॉ. ऋषी आचार्य यांनी स्वागत केले.

7 प्रदेशातील 270 शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील 15 हजार विद्यार्थ्यांनी या आयटी ऑलिपिंयाडमध्ये भाग घेतला , स्पर्धेचे हे नववे वर्ष होते. 4 विजेत्या विधार्थ्याना हेलीकॉप्टरने आझम कॅम्पसला पारितोषिक सोहळ्यास येण्याचा बहुमान मिळाला. विजेत्यांना लॅपटॉप, आय पॅड, टॅब आणि प्रमाणपत्रे देण्यात आली.

वेगवेगळ्या गटात रुमाना पानसरे, अरिशा शेख, मरियम शेख, अब्दूस खान यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. त्यांनाच हेलिकॉप्टरने आझम कॅम्पसच्या मैदानावर येण्याचा मान मिळाला. यावेळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ अमित गाला, हर्षद सांगळे, एमसीई सोसायटी संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम, सहसचिव इरफान शेख, ऋषी आचार्य,मुमताझ सय्यद, स्वतंत्र जैन,ताहिर खान, पूजा जाधव हे मान्यवरही या समारंभास उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे बक्षी म्हणाले, ” या कॅम्पसमध्ये लहान विद्यार्थी पण संगणक तयार करीत असतात, मोबाईल, आयपॅड दुरुस्त करतात, हे पाहून मी थक्क झालो.लहानपणापासून उद्योजकतेची बीजे रुजवण्याचा ध्यास महत्वाचा आहे. अनेक मोठया शैक्षणिक संस्था या विषयात काम करीत नाहीत. येथून शिकलेले विद्यार्थी गेमिंग, अॅनिमेशन इंडस्ट्रीला मोठे योगदान देतील, याची खात्री आहे”

अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ” झोपडपट्टीत राहणारा सुध्दा देशावर राज्य करण्याचे स्वप्न पाहू शकतो. तशी क्षमता विद्याथ्र्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यांच्यासाठी संगणक क्रांती, माहिती -तंत्रज्ञान क्रांतीचे पूरक वातावरण आम्ही तयार करीत आहोत. आपले प्रयत्न ही ‘ ड्यूटी ‘ आहे, अजून ‘डिव्होशन ‘, ‘ डेडीकेशन ‘ च्या पातळयावर सर्वांनी काम केले पाहिजे”

ऋषी आचार्य म्हणाले, “महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन इज्युकेशन सोसायटी कॅम्पस चे विद्यार्थी इतकी प्रगती करतील की ते हेलिकॉप्टर ने कॅम्पस च्या मैदानावर उतरतील, हे डॉ. पी. ए. इनामदार यांनी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे”

यावेळी ‘ पै आयसीटी अॅकॅडमी ‘ च्या संचालक मुमताझ सय्यद यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.