Pune : …… तर पाकिस्तानचे एकही विमान परत जाऊ शकणार नाही!- निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन

एमपीसी न्यूज- भारतीय वायुदलाकडे एवढी शक्ती आहे की भारतावर हल्ला करण्याची पाकिस्तानच्या हवाईदलामध्ये क्षमता नाही. त्यांनी हल्ला केलाच तर पाकिस्तानचे एकही विमान परत जाणार नाही. असा विश्वास निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची काळजी न करता पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे असेही ते म्हणाले.

आज भारतीय वायुदलाने केलेल्या कारवाईबाबत भारतीय वायुदलाच्या अभिनंदन करताना निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन म्हणाले, “आपण पाकिस्तानवर हवाई हल्ला करू नये, सर्जिकल स्ट्राइक करू नका पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत. असे अनेक तज्ज्ञांकडून सांगण्यात येत होते. मात्र भारतीय वायुदलाकडे एवढी शक्ती आहे कि पाकिस्तानच्या कोणत्याही तळावर आपण हल्ला करू शकतो. आज आपण १ हजार किलोचे बॉम्ब दहशतवादी तळावर टाकले”

“मात्र भारतावर प्रतिहल्ला करण्याची पाकिस्तानच्या हवाईदलामध्ये क्षमता नाही. त्यांनी हल्ला केलाच तर आपल्या विमानांच्या तावडीतून पाकिस्तानचे एकही विमान परत जाणार नाही. या हल्ल्यामधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कि भारत आपल्याकडे असलेल्या सर्व शस्त्रांचा वापर करून पाकिस्तानला धडा शिकवेल. भविष्यात भारत पाकिस्तानवर आणखी हल्ले करताना पाहायला मिळेल”असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.