Pune : विद्यार्थ्यांच्या सहभागातून रंगला वाखरीचा पालखी रिंगण सोहळा

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन

एमपीसी न्यूज- ज्ञानोबा माऊली, तुकारामांच्या अखंड जयघोषाने दुमदुमलेले शाळेचे प्रांगण… टाळ-मृदुंग वाजवित हरी नामाच्या गजरात तल्लीन झालेले बालचमू… दिंड्या आणि भगवे पताके हाती घेवून अश्वाच्या मागे धावत चिमुकल्यांनी पालखी रिंगण सोहळ््यात सहभाग घेतला. डोळ््यांचे पारणे फेडणारा वाखरीचा पालखी रिंगण सोहळ््या पुण्यात अनुभविण्याची संधी उपस्थितांना मिळाली. अशा चैतन्यमय वातावरणात वरुण राजाच्या साक्षीने छोट्या वारकºयांचा पालखी रिंगण सोहळा रंगला.

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे आषाढी एकादशीनिमित्त वाखरीचे पालखी रिंगण साकारण्यात आले. प्रभात टॉकीजसमोरील नू.म.वि.प्राथमिक शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना कटके, पोलीस नाईक अविनाश जोशी, महिला पोलीस छाया साळवे, शाळेच्या मुख्याध्यापिका आशा नागमोडे, सुनिता गजरमल, लिना घुगरे, सुनिल वाघमारे, स्नेहल डावकरे, निता चक्रनारायण, मंडळाचे अध्यक्ष पीयुष शाह, नरेंद्र व्यास, मधुकर कदम, गंधाली शाह, सागर घम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पालखी सह विद्यार्थी रिंगण सोहळ््यात सहभागी झाले होते.

पीयुष शाह म्हणाले, “आजच्या पिढीला वारीचा अभूतपूर्व सोहळा, महाराष्ट्रातील संतांचे कार्य कळावे म्हणून पालखी रिंगण सोहळ््याचे आयोडन करण्यात आले. पालखीसोहळ््यात सहभागी होणारे वारकरी कोण, ते वारीमध्ये का सहभागी होतात हे विद्यार्थ्यांना समजावे म्हणून पालखी रिंगण सोहळा शाळेत साजरा करण्यात आला”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.