Pune : पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

एमपीसी न्यूज- नाना पेठेतील महात्मा फुले हायस्कूल येथे (Pune) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व स्वामी विवेकानंद संस्था पुणे यांच्यातर्फे सोमवार दि.5 जून रोजी सकाळी दहा वाजता  पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

यासाठी पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील एकूण 21 उद्योजकांनी सहभाग दर्शविला आहे. त्यांच्याकडे भरतीसाठी 2830 पदे आहेत. या रोजगार मेळाव्यात दहावी-बारावी उत्तीर्ण तसेच सर्व शाखांचे पदवी, पदव्युत्तरपदवी, पदविकाधारक अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी आहेत.

Hinjawadi : उघड्या दरवाजावाटे चोरी करणाऱ्या दोघांना अटक

पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्यात नोकरी मिळू शकते. सर्व इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपापले पसंतीक्रम नोंदवावेत.

तसेच मुलाखतीस येताना उमेदवारांनी आपली मुळ शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डाच्या प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सा. ब. मोहिते यांनी (Pune) केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.