Pune : जम्मू-काश्मीर प्रश्नी’ युनोमध्ये जाण्याच्या’ पं नेहरुंच्या निर्णयाचे देशाकडूनही समर्थन – गोपाळ तिवारी

Congress News

एमपीसी न्यूज : – ‘स्वतंत्र भारताची’ ओळख निर्माण करून, (Pune) 1948 मध्ये पं नेहरू ‘जम्मू काश्मिर प्रश्नी’ युनो’त गेले, विविध ठरावा द्वारे जागतिक मान्यता घेतली व त्यानंतर “देशाने 17 वर्षे पं नेहरूंच्या निर्णय व धोरणांवर विश्वास व पसंती दर्शवुनच्” नेतृत्व करण्याची संधी दिली..!

नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशात स्वयंपुर्णतेचा व तांत्रिक साधन सामुग्रीचा तेंव्हा अभाव होता. त्या काळात युनो’त जाण्याचा निर्णय कालानारुप व परिस्थितीनुरुप होता. अखेर जम्मू-काश्मीर प्रश्नी’ युनो’त जाण्याच्या” पं नेहरुंच्या धोरणाचे व निर्णयाचे, समस्त देशाने ही निवडणुकांद्वारे वारंवार मान्य केले व तब्बल 17 वर्षे देशाच्या पंतप्रधानपदी पं नेहरुंना बसवले, ही बाब अमित शहा सोईस्कर विसरतात काय? व ‘जनतेने समर्थन दिलेल्या निर्णयाचा’ उपमर्द करतात काय? असा उपरोधीक सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.

देशवासियांकडून शिक्कामोर्तब झालेल्या निर्णयाची पुन्हा कालबाह्य वाच्यता करणे म्हणजे शिळ्या कढीला ऊतु आणण्याचा निंदनीय प्रकार आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात, ब्रिटीश विरोधी संघर्षात तब्बल 7 वेळा 11 वर्षे जेलमध्ये गेलेल्या पं नेहरुंच्या संघर्षाची, विद्वत्तेची व पात्रतेची भाजपच्या कोणत्याही नेताशी तुलनाच होऊ शकत नाही.

पं नेहरुंचे नांव घेण्याची पात्रताही नसणाऱ्या अमित शहांनी त्यावर बोलणे हे “देशापुढील ज्वलंत मुद्यांवरील लक्ष विचलीत करण्याचे भाजप’चे सोईस्कर व पलायनवादी तंत्र असल्याचा आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.

Bhosari : बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

2014 व 2019 च्या निवडणुकीत जनतेने पं नेहरुंच्या चुका दर्शवण्यासाठी नव्हे तर देशातील विद्यमान समस्या दुर करण्यासाठी, भ्रष्टाचार व काळा पैसा बाहेर काढुन जनतेस 15 लाख देऊन अच्छे-दिन आणण्यासाठी सत्ता बहाल केली होती, याचे स्मरण ठेवावे व (Pune) देशावरील वाढते कर्ज, महागाई, बेरोजगारी, सामाजिक सलोखा, शांतता व सुरक्षेकडे अमित शहांनी अधिक लक्ष द्यावे असे खडे बोल ही तिवारी यांनी सुनावले.

स्वातंत्र्योत्तर भारताच्या’ उभारणीत योगदान नसणाऱ्यांनी पं नेहरुंच्या चुका काढण्या पेक्षा, ‘स्वतंत्र व विकसित आयता भारत’ हातामघ्ये आल्या नंतर ही चिन ने हजारो किमी जमीन का बळकावली?याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी प्रथम ऊत्तर द्यावे, असेही काँग्रेसने सुनावले.

पं नेहरूंच्या जम्मू काश्मिर विषयी कालबाह्य निर्णयावर एकतर्फी टिका करीत केंद्रातील भाजप सरकार स्वतःचे अपयश झाकण्याचाच् सातत्याने प्रयत्न करत असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share