Pune : ‘पांजरपोळ ट्रस्ट’तर्फे पुणेकरांसाठी 43 लाखांचा निधी!

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’तर्फे 43 लाखांचा निधी देण्यात आला. हा एकूण 43 लाखांचा निधी कोरोना विरोधी उपाययोजना व पुणेकरांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात यावा, अशी विनंती ट्रस्टद्वारे करण्यात आलेली आहे.

आपल्या देशात कोरोणा विषाणू विरोधात लढाई सुरू आहे. दिवसेदिवस कोरोणा संक्रमित रुग्ण वाढत आहेत. परंतु, आपले प्रशासन कोरोना विरोधात जोरदार लढाई लढत आहेत. या लढ्यात त्यांचे मनोबल वाढवणे व त्यांना या लढ्यात जमेल तशी मदत करणे ही जबाबदारी प्रत्येक भारतवासियांची आहे, असे आम्ही मानतो.

याच अनुषंगाने आपल्या पुण्यामध्ये देखील आपले प्रशासन धाडसाने व तळमळीने कोरोणा विरोधात लढत आहे. या लढ्यात भोसरी येथील पुणे पांजरपोळ ट्रस्ट संस्था आर्थिक दृष्ट्या सहभागी झालेली आहे. या संस्थेद्वारे पुणे महानरपालिकेच्या कार्याकरिता २१ लाखांचा निधी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे देण्यात आला. कोरोना रुग्णांची काळजी घेणाऱ्या नायडू हॉस्पिटल आणि ससून रुग्णालयाला सहाय्य म्हणून प्रत्येकी रु ११ लाखांचा निधी ससूनचे अधिष्ठाता अजय चंदनवाले यांच्याकडे देण्यात आला.

याप्रसंगी ‘पुणे पांजरपोळ ट्रस्ट’चे अध्यक्ष श्रीधरजी पित्ति, ओमप्रकाश रांका, राजेश साकला, सुहास बोरा, भंवरलाल जैन, सुभाष राणावत व नगरसेवक सुशिल मेंगडे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. हा एकूण ४३ लाखांचा निधी कोरोणा विरोधी उपाययोजना व पुणेकरांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात यावा, अशी विनंती ट्रस्टद्वारे करण्यात आलेली आहे.

पुणे पांजरपोळ ट्रस्ट संस्था ही गेल्या १६५ वर्षांपासून अनाथ व दूध न देणाऱ्या गायींचा सांभाळ करते. आज या संस्थेमध्ये दोन ते अडीच हजार गायींचा सांभाळ केला जातो. कोरोनाच्या संकटात गायींचा सांभाळ शक्य नसणाऱ्यांनी आपल्या गायी येथे आणून नोंद करून सोडाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.