Panshet Dam: पानशेत धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग पूर्णपणे बंद 

एमपीसी न्यूज: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील पानशेत धरण (Panshet Dam) 100 टक्के भरल्याने या धरणासून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत होता. मात्र पावसाने उसंत घेतल्याने पानशेत धरणातून करण्यात येणारा विसर्ग रात्री 12 वा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता, श्रेणी 1 खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे.

Fit India Champion: पुण्यातील आयली घिया ठरली ‘फिट इंडिया चॅम्पियन’ 

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.पानशेत धरण हे आंबी नदीवर बांधण्यात आले आहे.(Panshet Dam) आंबी नदी ही मुठा नदीची उपनदी आहे. या दोन्ही नद्यांच्या काठावर लोकांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.