Pune : बुधवार पेठेतील सिंगालिया वाड्याचा भाग कोसळला!; ‘अग्निशमक दला’मुळे दोघे बचावले

एमपीसी न्यूज – पुण्यातील बुधवार पेठ येथील सिंगालिया वाड्याचा भाग कोसळला. हि घटना आज सकाळी 7.17 च्या सुमारास घडली असून यात दोघे जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी वाड्यातील मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आजींना सुखरूप बाहेर काढले आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

गंगुबाई कल्याणी आणि विनायक कल्याणी असे जखमींची नवे आहेत.

याबाबत ‘अग्निशमन दला’चे (कंट्रोल रूम) प्रभारी अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमक दलाला आज सकाळी 7.17  च्या सुमारास कॉल आला कि, दगडूशेठ हलवाई गणपती घेजारील गल्लीमधील अंदाजे 80-90 वर्षांचा जुना वाडा कोसळला आहे. यात दोघेजण अडकले आहेत. त्यानुसार अग्निशमक दलाने कसाब पेठेतील एक गाडी घटनास्थळी पाठवली. मात्र, वाडा 75 टक्के कोसळला होता. त्यामुळे मातीचा ढिगारे, लाकूड, विटा आदीमुळे अडकलेल्या लोकांचा शोध घेणे अवघड होते. तसेच अरुंद जागेमुळे अग्निशमक दलाला काम करणे अवघड होते.

यावेळी रेस्क्यू व्हॅन बोलविण्यात आली. रेस्क्यू टूलच्या सहाय्याने माती, लाकूड, विटा बाजूला करून वाड्यातील मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आजींना सुखरूप बाहेर काढले. तसेच अँब्युलन्स बोलवून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

तसेच उर्वरित 25 टक्के धोकादायक वाडा पाडण्यासाठी घोरपडीतील अग्निशमक दलाला बोलविण्यात आले. याकामी ‘अग्निशमन दला’चे (कंट्रोल रूम) प्रभारी अधिकारी प्रदीप खेडेकर यांच्यासह पाच जवान, फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी हजर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.