Pune : पुण्याचा पार्थ ओसवाल ठरला ‘द टिन इंडिया आयकॉन – रशिया 2020’ चा उपविजेता

एमपीसी न्यूज- नील ग्रुप ऑफ कंपनीतर्फे ‘द टिन इंडिया आयकॉन – रशिया 2020’ या आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये पुण्याचा पार्थ ललित ओसवाल उपविजेता ठरला. पार्थ पुण्यातील सॅल्सबरी पार्कमधील मॅकनरी हुम मेमोरियल हायस्कुलमध्ये सहाव्या इयत्तेत शिकत आहे.

रशिया येथील मॉस्कोमधील ओरल शहरामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील भव्य फॅशन शोमध्ये जगातील विविध ठिकाणांहून साऊथ अरेबिया , रशिया, भारत, आदी देशातून स्पर्धक सहभागी झाले होते . तेरा वर्षाखालील मुलामध्ये झालेल्या या स्पर्धेत पुण्याचा पार्थ ओसवाल उपविजेता ठरला.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल स्टुडन्टचे अध्यक्ष डॉ. युवराज ब्रह्मभट , रशियाच्या प्रसिध्द अभिनेत्री गलीना ग्लाजाओ मिरोना व पुण्यातील अभिनेता मनीष मन आदी मान्यवरांकडून ‘द टिन इंडिया आयकॉन – रशिया 2020’ फॅशन शोमध्ये पार्थ ओसवालला सन्मानित करण्यात आले.

पार्थ अभिनेता करण कुंद्रा यांच्याबरोबर एका फॅशन शोमध्ये सहभागी होणार आहे. त्याचे वडील ललित ओसवाल व आई मीना ओसवाल आणि आजी, आजोबा यांनी त्याचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.