Pune : माथाडी विधेयकाविरोधात पुकारलेल्या बंदमध्ये श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटनेचा सहभाग

एमपीसी न्यूज : – बाजार समितीचे केंद्रीकरण ( Pune) करणारे  2018 चे माथाडी विधेयक मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी कामगार संघटनांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील कामकाज बंद ठेवण्यात आल आहे. या बंदमध्ये श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटनेने  देखील सहभाग घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maval : तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवणार; दत्तात्रय पडवळ यांचा संकल्प

याविषयी अधिक बोलताना  मार्केट यार्डचे संचालक संतोष नांगरे म्हणाले की, माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी माथाडी विधेयक मांडण्यात आलेले आहे. माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे 2018 चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार समिती बनविणे) मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी कामगार संघटनांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या असून शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस पाठवू ( Pune) नये.

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share