Pune : उमेदवारीचे बॅनर लावणाऱ्या इच्छुकांवर पक्षाकडून कारवाई करणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनधिकृत बॅनर लावू नये. बॅनर लावून कोणालाही उमेदवारी मिळत नाही. जर पुणे शहरात ज्यांनी असे बॅनर लावले असतील तर, अशांवर पक्षाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील अतिउत्साही नेत्यांची कानउघडणी केली.

शनिवारी पुणे शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पोहचली. यावेळी त्यांना खूश करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि विधानसभेसाठी इच्छुकांनी शहरभर अनधिकृत होर्डिंग लावल्याचं आढळले.

काही ठिकाणी बॅनरमुळे रुग्णवाहिकांना अडचणी आल्याचे आढळले आहे. याबद्दल फडणवीस यांना विचारले असता त्यांनी अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना कारवाईचं इशारा देत कानउघडणी केली.

दरम्यान, महाजनादेश यात्रेच्या मार्गावरील काही झाडे तोडण्यात आली आहेत. याबद्दल विचारले असता कोठेही झाडे तोडण्यात आल्याचे दिसले नाही. मात्र, अशाप्रकारे एकही झाड तोडले असेल तर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like