Pune Passport Adalat News : प्रलंबित पासपोर्टसाठी 16 डिसेंबरला होणार ‘पासपोर्ट आदालत’

एमपीसी न्यूज – पासपोर्टसाठी अर्ज केलेल्या पण पासपोर्ट प्रलंबित राहिलेल्या पुणे विभागातील (पुणे, सोलापूर, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, बीड व नांदेड) अर्जदारांसाठी 16 डिसेंबरला बाणेर येथील पासपोर्ट ऑफिसमध्ये ‘पासपोर्ट आदालत’ आयोजित करण्यात आली आहे.

पूर्वनोंदणी करूनच या आदालतमध्ये सकाळी दहा ते दुपारी दिड या वेळेत अर्जदाराला सहभागी होता येणार आहे.

या आदालतमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी अर्जदाराला आपले नाव, संपर्क क्रमांक व फाईल क्रमांक यासह [email protected] या मेल पत्त्यावर माहिती पाठवावी लागणार आहे किंवा आरपीओ, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पासपोर्ट भवन, क्रमांक 5/2/2, बाणेर-पाषान लिंक रोड, बाणेर, पुणे-411045 या पत्त्यावर पत्र पाठवावे लागणार आहे.

ईमेल किंवा पत्र पाठवण्यासाठी 15 डिसेंबर सकाळी नऊ वाजेपर्यंत अंतिम वेळ देण्यात आला आहे.

अर्जदाराला पासपोर्टची गरज लक्षात घेऊन पासपोर्ट कार्यालयाच्या वतीने अर्जदारांना ई-मेल अथवा फोनवरून संपर्क केला जाईल. दिलेल्या वेळेत आवश्यक कागदपत्रे आणि ई-मेलची प्रत घेऊन अर्जदारांना पासपोर्ट कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.