Pune: केईएम रुग्णालयातील एक रुग्ण पॉझिटीव्ह, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 32 कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज – मधुमेह बळावल्याने पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल झालेल्या 52 वर्षीय रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 32 झाला आहे. त्यापैकी 10 रुग्ण औषधोपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

पुण्यात सापडलेला हा रुग्ण अथवा त्याच्या परिवारातील कोणीही परदेशात जाऊन आलेले नाही. त्यामुळे या रुग्णाला कोणामुळे कोरोना संसर्ग झाला असावा, याबाबत माहिती घेण्यात येत आहे. हा नवीन रुग्ण गेल्या काही दिवसात कोणाकोणाच्या संपर्कात आला, याचीही चौकशी सुरू आहे.

पुण्यातील सात तर पिंपरी-चिंचवडमधील तीनजण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात येत आहे. पिंपरीतील आणखी पाच रुग्णांची 14 दिवसांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यांच्या दुसऱ्या चाचणीचा अहवाल आज अपेक्षित आहे. उर्वरित 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.