_MPC_DIR_MPU_III

Pune : सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे समुपदेशन करून त्यांना घरी पाठवा : जिल्हाधिकारी

Patients with mild symptoms should be counseled and sent home: Collector

एमपीसी न्यूज – खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये कोरोना बाधित म्‍हणून उपचार घेत असलेल्‍या तथापि, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या किंवा सौम्‍य लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांचे समुपदेशन करुन त्‍यांना घरी पाठविण्‍यात यावे, असे जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम यांनी कळवले आहे.

_MPC_DIR_MPU_IV

जे रुग्‍ण कोरोना बाधित म्‍हणून उपचार घेत आहेत आणि कोरोनाची सौम्‍य लक्षणे आहेत किंवा कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र असे रुग्‍ण घरी जाण्‍यास नकार देत असतील तर त्‍यांची यादी महानगरपालिका प्रशासनाकडे पाठविण्‍यात यावी, असेही जिल्‍हाधिकाऱ्यांनी सांगितले.

खाजगी रुग्‍णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती घेण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरावर तपासणी पथक स्‍थापन करण्‍यात आले असून या पथकामार्फत तपासणी करण्‍यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

जर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले किंवा सौम्‍य लक्षणे असलेले रुग्‍ण खाजगी रुग्णालयात आढळून आले तर संबंधित रुग्‍णालयाच्‍या प्रशासनावर साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायद्यानुसार कार्यवाही करण्‍यात येईल, असा इशारा जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम यांनी दिला आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005  मधील कलम 25  अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.  13 मार्च 2020 पासून लागू करुन अधिसूचना निर्गमित केलेली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.