Pune : कंत्राटी कामगारांना तातडीने वेतन द्या : धीरज घाटे

महापालिका आयुक्तांना दिले मागणीचे निवेदन

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन काळात कार्यरत असलेल्या  कंत्राटी कामगारांना तातडीने वेतन देण्याची मागणी पुणे महापालिकेचे सभागृहनेते धीरज घाटे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.

य यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये साडेतीन ते चार हजार कंत्राटी कामगार काम करतात. या कंत्राटी कामगारांना संबंधित कंत्राटदारांनी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वेतन दिले नाही. त्यामुळे या कामगारांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

दर महिन्याला या कामगारांना वेतन मिळणे आवश्यक असताना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हे वेतन देण्यात आले नाही, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे त्यांचे थकीत वेतन तातडीने देण्यात यावे, अशी मागणी घाटे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

तसेच स्मशानभूमीतील कामगार, महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले व करोनाबाधित मृतदेहांची ने-आण करणारे चालक, महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांच्या वाहनांवरील चालक, विलगीकरण कक्षात कामे करणारे कर्मचारी, रॅक पिकर्स, समूह संघटिका आदींना विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही घाटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.