Pune : मॉर्निंगवॉकसाठी गेलेल्या वृद्धाचा कारच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – मॉर्निंगवॉकसाठी गेलेल्या वृद्धाचा कारच्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. ही घटना काल रविवारी (दि.16) सकाळी साडेसहाच्या सुमारास झगडे पार्क समोरील मुंढवा केशवनगर रस्त्यावर घडली.

गोविंद कुंडलिक जाधव (वय 60) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत जाधव(वय 36, रा.केसनंद, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत यांचे चुलते गोविंद जाधव हे काल सकाळी झगडे पार्क समोरील रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. दरम्यान एका भरधाव कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत जाधव गंभीररीत्या जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक कारसहित पसार झाला.

याप्रकरणी अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.