Pune : कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आणखी काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी : महापालिका आयुक्त

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आणखी काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी एका आदेशान्वये कळविले आहे.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाची 69 प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासह सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. केवळ दवाखाने सुरू ठेवण्यास सांगितले आहे.

तर, ज्या भागांत कोरोना नाही त्या ठिकाणी 12 तास दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी कोणती दुकाने सुरू करावीत याबाबत आतयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. दुकाने सुरू करताना काही सूचनांचे पालन करावे, असेही आदेशात म्हटले आहे.

इस्त्री, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणारे कच्चा मालाचा पुरवठा करणारे व्यवसाय, वाहन दुरुस्ती, फर्निचर विक्री, गृह उपयोगी सामुग्री, फूट वेअर, बांधकाम साहित्य विक्री या दुकानांना आणखी काही दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.

ही दुकाने सुरु करण्यासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशी 12 तासांची वेळ ठरवून देण्यात आली आहे. या दुकानातील कामगार आणि दुकानमालक हे कोरोना नसलेल्या क्षेत्रातील असावे. दुकानांत काम करताना सुरक्षित अंतर ठेवावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायजरचा वापर करणे आवश्यक आहे. अशा अनेक सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.