Pune: शहरातील सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांलगत टीडीआर वापरास परवानगी

Pune: Permission to use TDR on the side of six meter wide roads in the city अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना झटका

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील 6 मीटर रुंदीच्या रस्त्यांलगत टीडीआर वापरण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी दिली. त्यांनी हा निर्णय घेऊन पुणेकरांना दिलासा दिला. तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जोरदार झटका दिल्याची खमंग चर्चा महापालिकेत सुरू आहे.

 अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे तब्बल 40 लाख चौरस फुटांची बांधकामे वाढणार आहेत. त्यामुळे नोटबंदी, जीएसटी, रेरा आणि कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दरवर्षी 15 लाख चौरस फूट इतका टीडीआर खर्ची पडणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.

पुणे शहरात सहा मीटर रुंदीचे 800 किलोमीटर लांबीचे दोन हजार रस्ते आहेत. या रस्त्यांवर आता टीडीआर वापरास परवानगी मिळाली आहे. टीडीआरची मागणी वाढल्यास महापालिकेला आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी फायदा होणार आहे. याचा छोट्या बांधकाम व्यावसायिकांना फायदा होणार आहे.

पुणे शहरातील 6 मीटरचे सर्वच रस्ते 9 मीटर करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला होता. या निर्णयाला अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत स्थगिती देण्यात आली.

भाजपचा प्रस्ताव रद्द होण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना, मनसे आग्रही होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना ही चपराक मानली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.