Pune : सावकारी जाचाला कंटाळून इसमाची आत्महत्या

एमपीसी न्यूज- सावकारी जाचाला कंटाळून विषारी औषध पिऊन एका इसमाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 25) रात्री धायरी येथे घडली.

यशवंत हरिभाऊ पवार (वय 54, रा. रायकर मळा, धायरी) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. त्यांनी धायरीतील पाण्याच्या टाकीवर जाऊन विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

त्यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली असून त्यात राजकिय क्षेत्रातील दोघांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.