Pune : नव्वदी गाठलेले पेट्रोल आता 82 रुपयांच्या खाली

एमपीसी न्यूज- महिन्याभरापूर्वी रोज नवे नवे उच्चांक गाठणाऱ्या इंधनाच्या दरामध्ये रोज सातत्याने घट दिसून येत आहे. रोज इंधनाच्या दरामध्ये साधारणपणे 20-25 पैशांची घट होताना दिसून येत आहे. पेट्रोलच्या दरमध्येही आज 41 पैशांची घट झाली तर डिझेलच्या दरामध्ये 30 पैशांची घाट झाल्याचे दिसून आले आहे.

पुणे शहरात काल, बुधवारचा (दि. 21) पेट्रोलचा भाव 81.80 पैसे होता तर आज यामध्ये ४१ पैशांची घट होऊन पेट्रोलचा भाव 81.41 पैसे झाला आहे. बुधवारी 73.37 रुपयांनी मिळणारे डिझेल आज 73.07 पैशानी उपलब्ध झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.