Pune : ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’च्या गांधी सप्ताहानिमित्त छायाचित्र प्रदर्शन

एमपीसी न्यूज – राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा निमित्त ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ आयोजित गांधीजींच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन संदेश भंडारे (समन्वयक, दक्षिणायन चळवळ) यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षस्थानी डॉ. कुमार सप्तर्षी होते. यावेळी डॉ .प्रवीण सप्तर्षी, वैशाली भंडारे, संदीप बर्वे, सचिन पांडुळे. अभिजीत मंगल, कमलाकर शेटे, जिशान पटेल, रोहनसिंह गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचा गांधी सप्ताहानिमित्त हा अभिनव उपक्रम आयोजित केला गेला.दिनांक ७ ऑक्टोबर पर्यंत हे प्रदर्शन गांधीभवन, कोथरूड येथे सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत सर्वांसाठी खुले राहील.

‘गांधीजींच्या जवळपास ४५० दुर्मिळ छायाचित्रातून महत्वाच्या काही छायाचित्रांची निवड केली. पुढे हे गांधी विचार प्रेमी संस्थांना राज्यभर उपलब्ध करुन देण्याचा ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चा मानस आहे’.गांधीजींच्या बालपण, जीवनप्रवासाचे, जीवन संघर्षाचे छायाचित्र रुप दर्शन या प्रदर्शनातून पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. सर्व छायाचित्रे कृष्णधवल असून, त्यात गांधीजींच्या प्रारंभीच्या काळापासून, विविध चळवळी, दांडीयात्रा, असहकार चळवळ ते हत्येपर्यंतच्या प्रसंगांच्या छायाचित्रांचा समावेश आहे.

सचिन चव्हाण, अतुल नंदा यांनी प्रदर्शनाची मांडणी केली.ही छायाचित्रे मिळवण्यासाठी विविध संस्था आणि व्यक्ती यांचे सहकार्य लाभले. 20 वर्षे यावर संशोधन सुरू होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.