Pune : मेट्रोचा खांब पाडल्याने आर्थिक नुकसान नाही ; पालिका प्रशासनाचे अजब उत्तर

एमपीसी न्यूज : शहरातील बहुचर्चित मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गाचे काम सुरू आहे. या मेट्रोच्या मार्गातील छत्रपती संभाजी महाराज पुलाजवळील नदीपात्रातील १५८ क्रमांकाचा खांब पाडण्यात आला. मात्र, हा खांब पाडण्यात आल्यानंतरही ‘महामेट्रोला कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही, असे अजब लेखी उत्तर महापालिका प्रशासनाने दिले आहे.

पुणे महापालिकेच्या सप्टेंबर महिन्यातील सर्वसाधारण सभेच्या लेखी प्रश्नोत्तरात शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी हा प्रश्न विचारला होता. त्यामध्ये मेट्रोचे काम, खर्च आणि मार्गात किती वेळा बदल केले आणि किती ठिकाणी मेट्रोच्या मार्गात उभारलेले खांब पाडण्यात आले, याबाबत विविध प्रश्न विचारले होते. त्याला पालिका प्रशासनाने लेखी उत्तरे दिली आहेत. त्यात पुणे शहरात आजपर्यंत मेट्रोच्या झालेल्या कामांमध्ये वनाझ ते सिव्हिल कोर्ट या मार्गातील छत्रपती संभाजी महाराज पुलाजवळील नदीपात्रातील खांब क्रमांक 158 पाडण्यात आला. पण हा खांब पाडल्यामुळे महामेट्रोस कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही, असे नमूद केले आहे. त्यावरून पालिका प्रशासन खोटे बोलत असल्याचे स्पष्ट होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.