Pune News : पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा चालकांचा संप अखेर मागे

एमपीसी न्यूज : पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये पुकारण्यात (Pune News) आलेला रिक्षा चालकांचा संप संध्याकाळी मागे घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार असून, बेकायदा टॅक्सी चालकांवर कारवाई होणार आहे. 

डॉ केशव क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांसमोर आज घोषणा केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतर येत्या 10 दिवसात पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात येईल.(Pune News) या समितीत जिल्हाधिकारी यांच्यासह आर टी ओ चे अधिकारी तसेच ट्रॅफिक पोलिस विभागाचे अधिकारी असतील. या समितीकडून येत्या 10 दिवसात बेकायदा बाईक टॅक्सीवर कडक कारवाई केली जाईल.

Pune News : शिरूर येथील तत्कालीन तहसीलदार, महसूल सहाय्यक, तलाठी व 2 खाजगी इसमांवर 42 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी कारवाई

येत्या 10 दिवसात बेकायदा टॅक्सी चालकांवर कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा आज पुण्यातील आर टी ओ कार्यालयाबाहेर शेकडो रिक्षा चालकांनी चक्का जाम आंदोलन केले होते.शहरातील काही भागात या संपत सहभागी न होणाऱ्या रिक्षांवर दगडफेक देखील करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.