PMPML Extra Buses: पीएमपीएमएल कडून रक्षाबंधन निमित्त जादा बसेस

एमपीसी न्यूज : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी गुरूवार, दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधनसणानिमित्त परिवहन महामंडळामार्फत (PMPML Extra Buses) मार्गावर 54 ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

दरवर्षी रक्षाबंधनच्या दिवशी मोठ्या संख्येने प्रवासीवर्ग प्रवास करतात त्यामुळे दरवर्षीप्रमाणे परिवहन महामंडळाने यंदा ही “रक्षाबंधनदिवशी प्रवाशांची गेेरसोय होऊ नये येसाठी 54 ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. दररोज 1 हजार 755 बसेस मार्गावर धावतात 11 ऑगस्ट रोजी 1 हजार 809 बसेसचा ताफा महामंडळाकडून मार्गावर धावणार आहे.

Charholi Temple: चऱ्होली येथील ग्रामदैवत वाघेश्वर महाराज मंदिरात शिव दर्शनासाठी भाविकांची गर्दी

या जादा बसेस गर्दीच्या मुख्य बस स्थानकांवरून कात्रज, चिंचवड गाव, निगडी, सासवड, हडपसर, वरवंड, वाघोली, जेजुरी, आळंदी, तळेगाव, भोसरी, रांजणगाव, राजगुरूनगर व देहूगाव इत्यादी ठिकाणी जादा बसेस सोडण्यात येतील. याकरीता वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच महत्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत.(PMPML Extra Buses) रक्षाबंधन” गुरूवारी असल्यामुळे यावर्षी दिनांक 11 व 12 ऑगस्ट या दिवशी जादा बसेसचे नियोजन केलेले आहे. तसेच महामंडळाकडील अधिकारी, लिपीक व इतर कर्मचारी यांची महत्वाच्या स्थानकांवर व थांब्यांवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी व वाहतूक नियंत्रणासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.