Traffic Jam : मुसळधार पावसामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात वाहतूक कोंडी ; खड्ड्यांमुळे वाहनचालक बेहाल

एमपीसी न्यूज: गेले काही दिवस पुणे, पिंपरी-चिंचवड व आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे बुधवारी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. खड्डयांमुळे वाहनांचा वेग कमालीचा संथ झाल्याने वाहनचालकांना कोंडी(Traffic jam) आणि खड्ड्यातून मार्ग काढावा लागल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागले.

जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले. पावसाने उघडीप दिल्याने खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. शहरात गेल्या चार दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू असून पावसामुळे तात्पुरती डागडुजी करुन बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांमधील खडी बाहेर आली आहे. खड्ड्यात साठलेले पाणी आणि रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खडीमुळे वाहतुकीचा वेग संथ झाला आहे.

 

बुधवारी सकाळी शहरात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर शहरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पावसामुळे शहरातील अनेक भागातील सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली. पावसामुळे मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा वेग संथ झाला.(Traffic jam) खड्डे, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातील वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.

Terrorist attack: दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद

 

पुण्यातील डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, आपटे रस्ता, कर्वे रस्ता, आरटीओ चौक, शंकरशेठ रस्ता, सातारा रस्ता, शास्त्री रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता परिसरात कोंडी झाली होती. मध्यभागातील बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.(traffic jam) परिणामी शाळा, महाविद्यालयात जात असलेल्या विद्यार्थ्यांना, व चाकरमान्यांना या कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहनांचा रांगा लागल्या होत्या. पुणे स्टेशन परिसरातून प्रवास करणारया आनंद जोशी यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना सांगितलं की, मी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास पुणे स्टेशनवरून निघालो अवघ्या काही मिनटांच्या अंतरावर असलेल्या आरटीओ चैाकात पोहचायला मला जवळपास एक तास लागला. तर चिंचवड स्टेशनला मी 7.30 वाजता पोहोचलो. पुणे स्टेशन परिसरात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या असंही जोशी यांनी सांगितले.

 

पुणे शहराबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्येही ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. येथील तळवडे, फुगेवाडी, निगडी परिसर संपुर्णपणे जॅम झाला होता. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड कोर्ट ते मोरवाडी चौकात झालेल्या वाहतूक कोंडीने नागरिकांना पुरते बेजार करून टाकले होते.(Traffic jam) दोपोडी ते खडकी बाजार याठिकाणी ही वाहतूक कोंडी झालेली दिसून आली. पुण्याच्या दिशेने जाणार्‍या दोन्ही लेनवर कोडीं झाली होती. त्यात आज रक्षाबंधनाचा सण असल्याने लोक खरेदीसाठी आणि प्रवासासाठी  बाहेर पडल्याने शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली. एकंदरीतच, पाउस, खड्डे आणि वाहतूक कोंडी असे काहीसे चित्र बुधवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पहायला मिळाले,

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.