Pune News :  पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रभागांचा कच्चा आराखडा सादर करण्यास मुदत वाढ

एमपीसी न्यूज – आगामी पुणे, पिंपरी – चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रभागांचा कच्चा आराखडा सादर करायची मुदत उद्या ( दि.30) संपुष्टात येत होती. मात्र आता हा आराखडा तयार करण्यास 6 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

पुण्यासह औरंगाबाद आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेने ही हेच कारण सांगत 15 दिवस मुदतवाढ मागितली होती मात्र कच्चा प्रभाग आराखडा सादर करण्यास 6 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार आगामी पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर नोव्हेंबर च्या पहिल्याच आठवड्यात 30 नोव्हेंबर पर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याचे आदेश सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते.

विशेष असे की हा निर्णय झाल्यानंतर लोकसंख्या वाढीनुसार नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या सततच्या बदलणाऱ्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग रचना व अन्य तांत्रिक बाबींमध्ये विलंब होत गेला आहे, ही वस्तुस्थिती आहे.

यामुळेच मागील आठवड्यात पुण्यासह तीन महापलीकांनी कच्चा प्रभाग आराखडा सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी असे पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. महापलिकाकांडून केलेल्या मागणीवर विचार होऊन निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.