Pune : देखभालीच्या कामांसाठी पुणे-लोणावळा मार्गावरील दोन लोकल पुढील महिनाभर रद्द

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांच्या देखभालीचे काम करण्यासाठी दुपारच्या वेळेतील दोन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत या लोकल रद्द राहणार आहेत. प्रवाशांनी बदल लक्षात घेत प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

# गाडी क्रमांक 99818 पुणे स्थानकावरून दुपारी 1 वाजता सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

# गाडी क्रमांक 99813 लोणावळा स्थानकावरून दुपारी 02 वाजता सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.