Pune : पुणे जिल्‍ह्यातील पानटपऱ्या पुढील आदेशापर्यंत बंद – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून पुणे जिल्हयातील सर्व पानटपऱ्या बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला (कोवीड-19) जगभरात पसरलेला साथीचा आजार म्‍हणून घोषित केलेला आहे. पुणे शहरामध्‍ये आणि परिसरामध्‍ये परदेशातून आलेले देशी, विदेशी नागरिक, पर्यटक यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव पसरण्‍याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी पुढील आदेशपर्यंत जिल्ह्यातील पान टपऱ्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.