_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune : राज्य राखीव पोलीस दलाचे प्लाझ्मा दान; आज सहा जवानांचे रक्तदान

पहिल्या टप्यात सोळा जवान पात्र झाले आहेत. ; State Reserve Police Force's plasma donation for COVID-19 patients.

एमपीसी न्यूज – बै. जी.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील रक्तपेढीमध्ये राज्य राखीव पोलीस बल गट-1 पुणे येथील जवानांनी शुक्रवारी (दि. 7) सकाळी कोवीड प्लाझ्मा दान केला. यासाठी पहिल्या टप्यात सोळा जवान पात्र झाले आहेत. यामध्ये आज सहा जवानांनी कोविड प्लाझ्मा दान केले.

वेळी राज्य राखीव पोलीस बल पुणे येथील पोलीस महानिरीक्षक नवीनकुमार रेड्डी आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या हस्ते पहिल्यांदा कोवीड प्लाइमा दान करणा-या जवानांचे प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देवून स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

पहिल्या टप्यात सोळा जवान पात्र झाले आहेत. यामध्ये आज सहा जवानांनी कोविड प्लाझ्मा दान केले. रोज सहा-सहा जवान कोवीड प्लाझ्मा दान करण्यासाठी ससून रुग्णालय रक्तपेढीमध्ये येणार आहेत.

यावेळी राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक नवीनकुमार रेड्डी म्हणाले की, “राज्य राखीव पोलीस बलाचे पुणे विभागातून एकूण दोनशेच्या जवळपास जवान कोविड पॉझीटीव्ह आले होते. यामध्ये कोविड प्लाइमा दान करण्यासाठी 85 जवानांचे समुपदेशन केले.

त्यांपैकी डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत ऐच्छिक 65 जवानांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससुन रुग्णालय रक्तपेढीमध्ये पाठविण्यात येणार आहेत. जे प्लाझ्मा दान करण्यास पात्र ठरतील त्यांना टप्या-टप्याने कोविड प्लाझ्मा दान करण्यासाठी ससून रक्तपेढीमध्ये पाठविण्यात येवून दान करुन घेण्यात येईल.”

ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले की, ससून रुग्णालयासाठी रक्तदानाच्या माध्यमातून नेहमीच राज्य राखीव पोलीस बलाचे सहकार्य लाभत असते. कोरोना महामारीच्या संकटातही बाहेरचा बंदोबस्त करुनही अथक परिश्रम या जवानांनी घेतले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

यामध्ये काम करतांना ते कोरोना पॉझीटिव्ह आले. त्यामध्ये विजयी होवून निगेटिव्ह आल्यानंतर एका महिन्यांनी परत कोवीड प्लाझ्मा देण्यासाठी हेच जवान मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. यांच्या बरोबरच केंद्रीय राखीव पोलीस बल ही प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे आलेला आहे.

पुढच्या आठवड्यात त्या जवानांचे ही प्लाझ्मा दान सुरु करणार आहोत. यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर कोवीड निगेटिव्ह झालेल्या लोकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, हि काळाची गरज आहे.

एका कोवीड प्लाझ्मा दानातून दोन कोरोना रुग्णांचा जीव वाचवू शकतो. यासाठी सामाजिक बांधिलकी समजून लोकांनी पुढे यावे, असे आवाहन ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी केले आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि जवानांना समुपदेशन करुन वारंवार जवानांच्या व त्यांच्या वरिष्ठांच्या संपर्कात राहून कोवीड प्लाझ्मा दान करण्यासाठी जवानांना तयार करण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉ. नकाते, प्राध्यापक व विभागप्रमुख, शरीरविकृतीशास्त्र डॉ. नलीनी काडगी रक्तपेढी प्रमुख, डॉ. गणेश लांडे आणि डॉ, शंकर मुगावे समन्वयक-समुपदेशक तथा वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक यांनी परिश्रम घेतले.

या वेळी राज्य राखीव पोलीस बलाचे सहाय्यक समादेशक खेडेकर, उपनिरीक्षक प्रफुल्ल खडपकर आणि रक्तदाता प्लाझ्मा दाता व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

तसेच ससून रुग्णालय रक्तपेढीतील समाजसेवा अधिक्षक, तंत्रज्ञ आणि रक्तसंकलन अधिकारी व कर्मचारी देखील प्लाझ्मा दान कार्यक्रमासाठी बहूमोल सहकार्य करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.